आपला जिल्हा

आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालयात हिंदी सप्ताह साजरा.

शेवगाव प्रतिनिधी

आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र विद्यालय शेवगाव येथील हिंदी विभागातर्फे दिनांक ०८ ते १४ सप्टेंबर २०२१ या दिवशी हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान दररोज ऑनलाईन हिंदी वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, चुटकुले, जोक सांगणे, आदिंचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सहभाग नोंदविला होता. हिंदी सप्ताहाची सांगता दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी विद्यालयात करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य अरुण चोथे आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी विद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ अन्नदाते प्रा.रावसाहेब शेळके, प्रा.प्रमोद फलके, प्रा.रोहिणी आघवणे, प्रा.शितल शेरकर, प्रा.मनोज नरवडे, श्रीमती मनीषा शेळके, रमेश खेडकर, राम गाडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आदिनाथ अन्नदाते यांनी तर प्रा.प्रमोद फलके यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे