आपला जिल्हा

कळसपिंपरी गावाचा इतर गावांनी आदर्श घ्यावा… आमदार मोनिकाताई राजळे

सार्वजनिक गणपती महोत्सव, कळसपिंपरी यांनी काल केलेल्या गणपती वित्सर्जन केलेल्या नियोजीत कार्यक्रमाची चर्चा सगळया तालुक्यात पसरली आहे.. कळसपिंपरी गावचे विद्यमान सरपंच दिगू शेठ भवार यांच्या मंडळांनी गणपती बाप्पा ची अगदी साजेशे अशे नियोजन करून दहा दिवस गावातील जोडीच्या शुभ हस्ते बाप्पा ची आरती करण्यात आली.आणि दहा दिवस बाप्पासमोर धार्मिक पद्धतीचे म्हणजे कीर्तन, भजन करण्यात आले. काल बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी वारकरी संप्रदायला व संतांना पटेल अस पारंपरिक पद्धतीने ढोल -ताशा आणि ह. भ. प लक्ष्मण महाराज भवार यांच्या मार्गदर्शनाने व ह. भ. प. प्रवीण महाराज घायाळ वैष्णव आश्रम कोरडगाव यांच्या आधाराने भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला..

 

यावेळी मधुर आवाज असणारे गायक मंडळी, मृदूंगाचार्य, टाळ वादक, पेटी वादक गावातील तरुण मित्रांनी जोडीने फुगड्या खेळून गवळणी म्हणत बाप्पा ला निरोप दिला… यावेळी महिला मंडळ डोक्यावर वृक्ष घेऊन आणि लहान मुली कळस तांब्या घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली…. यावेळी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.. आणि सरपंच साहेब व गावातील भजनी मंडळ यांचं धार्मिक पद्धतीचे नियोजन पाहून सर्वांचे कौतुक केलं..आणि या गावाचा असा आदर्श बाकीच्या गावांनी घ्यावा म्हणजे आपली भारतीय संसुकृती टिकून राहील..

 

यावेळी आमदार ताईसाहेब सोबत पंचायत समिती सदस्य विषणुपंत अकोलकर, सुभाष केकाण, कोरडगावचे सरपंच बिटू नाना देशमुख, नारायण तात्या काकडे, बाळू देशमुख याचबरोबर यावेळी गावातील सरपंच दिगंबर भवार शिवनाथ येढे आनंद पवार भानुदास शेळके बाळासाहेब बाकरे दादासाहेब झिरपे योगेश शेळके बाळासाहेब बुळे संदीप शेठ राठोड रवी शेठ जाधव बबलू शेठ चव्हाण गणेश मापारी हिरामन गाडे संजय मिसाळ श्रीकांत मिसाळ धनंजय गाडे लखन तरटे अंकुश मिसाळ अंकुश तरटे वैभव भवार पांडुरंग मिसाळ व सर्व सरपंच दिगंबर भवार मित्र मित्र मंडळ आदी मंडळी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे