आपला जिल्हा

चंद्रकांत महाराज लबडे यांना कोविड योध्दा पुरस्कार

शेवगाव / प्रतिनिधी

स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने कोविड काळात व इतर सामाजिक कार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या ना पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजन केला होता. त्या कार्यक्रमात लबडे महाराजांना कोविड योध्दा पुरस्कार देण्यात आला.
लबडे महाराज अनेक सामाजिक कार्यात व शिव कार्यात अग्रेसर असतात.

 

कोविड काळात त्यांनी अनेकांना हॉस्पिटलमध्ये बेड, प्लाझ्मा, ब्लड व इतर औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली. तसेच महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे अडकले असेल तर त्यांच्या टिम कडुन त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. कोविड काळात त्यांनी अनेकांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले. तसेच रक्त दान शिबिरे हि आयोजित केले.

 

चंद्रकांत महाराज लबडे काही कारणास्तव कार्यक्रमाला जाऊ शकले नाही म्हणून पत्रकार निजाम भाई पटेल यांनी महाराजांच्या ऑफिसला जाऊन प्रमाणपत्र दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे