आपला जिल्हा

स्वराज्यध्वज यात्रेचे शेवगाव मध्ये जंगी स्वागत ..

शेवगाव

 खर्डा ता. जामखेड येथील भुईकोट किल्ल्यासमोर आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणा-या भारतातील सर्वात उंच भगव्या स्वराज्य ध्वजाचे शेवगाव येथे उत्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. शहरातील पाथर्डी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील आणि पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष कमलेश लांडगे व त्यांच्या पत्नी शिवकन्या लांडगे यांच्या हस्ते स्वराज्य ध्वजाचे पुजन करण्यात आले.

खर्डा येथील किल्ल्यासमोर आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात भव्य अशा ७४ मीटर उंचीच्या भव्य स्वराज्य ध्वजाची उभारणी १५ आक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील सहा राज्य व महाराष्ट्रातील ३६ जिल्हयातील ७४ प्रेरणास्थळावरुन १२ हजार किलोमीटरचा प्रवास ३७ दिवसात करुन भगवा स्वराज्य ध्वज खर्डा येथे पोहचणार आहे. वेरुळ येथील कैलास मंदीरापासून आज ११ व्या दिवशी ध्वजाचे आगमन पैठण मार्गे शेवगाव येथे झाले. यावेळी शहरातील नागरीक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाक्याची आतीषबाजी करुन उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, पंचायत समितीचे सदस्य गंगा पायघन, शिवाजी नेमाणे, मंगेश थोरात, संभाजी ति़डके, शरद जोशी, संतोष जाधव, अमृत इसारवाडे, अभिजीत आहेर, रोहण साबळे, कृष्णा सातपुते, समीर शेख, वहाब शेख, गोविंद किडमींचे, संतोष पावसे, शफीक शेख, आप्पा भुजबळ, दिपक कुसळकर, बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के आदींसह नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे