Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि…बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

 

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना ‘गुलीगत धोका’ देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयासह सूरजवर बक्षीसांचाही वर्षाव झाला आहे. नेमकं त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर बक्षीस स्वरूपात काय काय मिळाले आहे? हे जाणून घेऊयात. (suraj chavan winner of bigg boss marathi season 5 how much prize money he get abhijit sawant) 

 

बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला बक्षीस स्वरूपात 14 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आलेआहे. 

 

 

Leave a comment