आपला जिल्हा

‘देशरत्न ’चा प्रकाशन सोहळा : शुभेच्छांनी दुणावला ऋणानुबंध…!

अहमदनगर:सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि एकूणच माध्यम जगतात झालेली प्रगती अशा वेळी सध्यस्थितीमध्ये
नवीन वर्तमानपत्र काढून ते चालवणे हे सोपे राहिलेले नाही. वाचकांच्या आवडीनिवडी बदललेल्या असताना आणि वर्तमानपत्राची आर्थिक गणिते अत्यंत दोलायमान असताना एक दर्जेदार वर्तमानपत्र काढून एक वाचक चळवळ उभी राहावी म्हणून प्रयत्न करणे हे एक आव्हानच आहे.
देशरत्न या दैनिकाचे मालक विजय आणि कमलेश नवले यांनी हे आव्हान स्वीकारून महाराष्ट्रातील मराठी दैनिकांच्या परंपरेला साजेल असे एक दर्जेदार वर्तमानपत्र सुरू केले असल्याचे मत माजी आ. पांडूरंग अभंग यांनी दैनिक देशरत्न प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले ,ते पुढे म्हणाले कि, वर्तमानपत्राच्या व्यवसायामध्ये असलेला एक मराठी माणूस म्हणून आणि मराठी वाचकांपर्यंत दर्जेदार वर्तमानपत्र पोहोचवणारा एक संपादक म्हणूनही त्यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
अत्यंत सुंदर छपाई, आकर्षक मांडणी आणि नवनवीन प्रयोग करत येणारे हे
वर्तमानपत्र महाराष्ट्रातील कानाकोप-यात पोहोचावे आणि दीर्घायुषी व्हावे, वाचक चळवळ म्हणून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणारे एक प्रभावी माध्यम ठरावे या निमित्ताने मी शुभेच्छा दिल्या यावेळी क्षितिजभैय्या घुलेपाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि,समाजातील चांगल्या – वाईट गोष्टींवर वृत्तपत्रमाध्यम प्रकाशझोत टाकत असतात. जनसमूहाला आरसा दाखवण्यासाठी ते काम करत आहेत. समाजाची सेवा करणे हे वृत्तपत्र लेखकांचे काम आहे, असे मत लोकनेते मारुतरावजी घुलेपाटील ज्ञानेश्वर सह.साखर कारखाना चे संचालक व शेवगाव पंचायत समिती चे सभापती क्षितिजभैय्या घुलेपाटील यांनी मांडले. समाजाची सेवा करणे, हे लेखकांचे काम असून याच भावनेतून त्यांनी लेखणी चालवायला हवी. लेखकांनी चांगले कार्य करत राहावे. चांगल्या कामांची पोचपावती कोणी देवोत ना देवोत, मनोदेवता ही देतच असते,’असे घुलेपाटील यांनी म्हटले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.सुनिताताई गडाखपाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, एक धडपड्या पत्रकार म्हणून मी विजय आणि कमलेश नवले यांना पाहते. दैनिक देशरत्न सुरु करून त्याने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. एक उत्तम लेखक म्हणून त्याच्याकडे पाहते. देशरत्न हे वर्तमानपत्र वाढविण्यासाठी विजय आणि कमलेशची सततची धडपड , सततचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील ,असे सांगून त्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या तर जेष्ठ नेते काॅ बाबा आरगडे यांनी सांगितले कि,फुले , शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे देशरत्न हे वर्तमान पत्र आहे. नेहमीच सत्याची कास धरून समाज मनाचा आरसा म्हणून सिद्ध झाले पाहिजे. संविधानिक लोकशाहीचा वारसा जपणारे हे वर्तमान पत्र राहिल यात मनामध्ये शंका नाही तसेच या वर्तमान पत्राने सदैव सत्याची बाजू धरावी , हीच शुभेच्छा !

या वेळी भाऊसाहेब सावंत,यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब आरगडे यांनी केले यावेळी रामकृष्ण आठरे यांच्यासह आण्णासाहेब आरगडे,भाकचंद्र चामुटे,रमेश मोटे, नानासाहेब आरगडे,महेश ठुबे,ज्ञानेश्वर आरगडे,रोहित मोटे,अजय म्हस्के, दादासाहेब नवले, रामकिसन आरगडे,दिलीप बोधक,अभिजीत बोधक,रोहित बोधक,नरेंद्र आरगडे अक्षय बोधक,अक्षय आरगडे,आप्पासाहेब आरगडे,प्रकाश मुळक, विशाल आरगडे,अभिषेक बनसोडे,पञकार सचिन कडू,पञकार कानिफनाथ पवार,बंटी आरगडे,सिद्धांत आरगडे,नितीन आरगडे,भाऊसाहेब पंडित,भारत आरगडे, आकाश नवीन अनेक सहकारी व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे आभार शेख यांनी मानले यावेळी सोशलडिस्टन चा वापर छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.

दैनिक देश रत्न प्रत्येक घटनेची पडताळणी केल्याशिवाय बातमी प्रदर्शित न करणार असल्यामुळे अनेक अफवांना आळा बसेल.
—–ह.भ.प.श्री.भास्कगिरी महराज.
(देवगड)

अहमदनगर जिल्हा हि महाराष्ट्राची शान आहे.दैनिक देशरत्न हे नेवासाच्या भूमीचे मुखपत्र आहे. समाजाच्या विकासाठी , शासनाच्या विविध योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी दैनिक देशरत्न नक्कीच काम करेल असा विश्वास व्यक्त करतो.
—मा.श्री.कमलेश(जालिंदर) बाबासाहेब नवले
(सहसंपादक दैनिक देशरत्न,संस्थापक अध्यक्ष जीवन ज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य)

दैनिक देशरत्न जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करेल. आणि वास्तविकतेला समोर आणेल.
—–मा.श्री.राऊसाहेब कांगुने पाटील.
(संभापती नेवासा तालुका)

दैनिक देशरत्न ज्वलंत प्रश्नावर ती प्रकाश टाकताना दिसतोय. त्यामुळे एक आशा नेवासा तालुका मधील लोकांना मिळाली आहे.
—–मा.श्री.दत्तु भाऊ काळे.
(जिल्हा परिषद सदस्य भाजपा)

वाचन संस्कृती पासून दुरावलेला युवकांसाठी वाचनाची गोडी वाढवण्याचं काम दैनिक देशरत्न करेल.
—–मा.श्री.कशिनाश आण्णा नवले पाटील.
(राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका अध्यक्ष)

सौंदाळा या छोट्या आणि ग्रामीण भागातून येथून प्रसिद्ध होत असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात , इथल्या विकासाला चालना देण्यासाठी दैनिक देशरत्न ने काम करावे. हि सदिच्छा व्यक्त करतो .
—-मा.श्री.गणेश गव्हाणे पाटिल.
(माजी संरपच भेंडा,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस)

शेतकऱ्याचा पोरगा वर्तमानपत्रही चालू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे दै. देशरत्न.
—-मा.श्री.तुकाराम मिसाळ.
(माजी जिल्हा परिषद सदस्य)

दैनिक देशरत्न हा एकमेव वर्तमानपत्र असेल या वर्तमानपत्राला युवकांकडून सर्वात जास्त लोकप्रियता मिळत आहे.
—–मा.श्री.भाऊसाहेब सावंत पाटील.
(सरपंच चिखलवाडी ग्रामपंचायत)

दैनिक देशरत्न हा जाहिराती पेक्षा जनसामान्यांची मते मांडण्यास सक्षम आहे असे दिसून येते. येणाऱ्या काळात हा वर्तमानपत्र जनसामान्यांचा आवाज बनेल.
—–मा.श्री.बाळासाहेब झावरे पाटील.
(सामाजिक कार्यकर्ते)

दैनिक देशरत्न एक आदर्श आणि निपक्षपाती वर्तमानपत्र असून अनेक लोकांच्या वाचन छंदातील भर म्हणून लाभदायक आहे.
—– मा.श्री.ज्ञानदेव गंगाधर आरगडे पाटील.
(माजी चेरमन सोसायटी,सौंदाळा)

अहमदनगर जिल्ह्याला निपक्षपाती व निर्भीड अशा वर्तमान पत्राची गरज होती आणि तो दैनिक देशरत्न या रूपाने मिळाला आहे.
—-मा.श्री.शरदराव आरगडे पाटील.
(संरपच,सौंदाळा ग्रामपंचायत)

दैनिक देशरत्न कडे लोक सामान्य लोकांचा वर्तमानपत्र अशा दृष्टिकोनाने बघत आहे. आणि हे वर्तमानपत्र तळागाळातील सर्व बातम्यांना जागा दिल असं लोकांचा मनाने आहे.
—–मा.श्री.इ.जि.बाळासाहेब नवले पाटील.

जुन्या वर्तमानपत्रांच्या स्पर्धेत वटवृक्ष सारखं उभा राहण्यास दैनिक देशरत्न हा समर्थ आहे. आणि तु या सर्वांमध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.
—–मा.श्री.डॉ.शिवाजी शिंदे पाटिल.
(मार्केट कमिटी सभापती नेवासा,संरपच भेंडा.बु ग्रामपंचायत)

समाजातील अनेक कलागुणांना समोर आणण्याचं काम दैनिक देशरत्न करेल. आणि अनेकांसाठी तो खुले व्यासपीठ म्हणून समोर येईल.
——मा.श्री.अशोक दादा मिसाळ.
(संचालक भेंडा सहकारी कारखाना)

दैनिक देशरत्न ज्वलंत प्रश्नावर ती प्रकाश टाकताना दिसतोय. त्यामुळे एक आशा नेवासा तालुका मधील लोकांना मिळाली आहे.
—-सय्यद तन्वीर सिकंदर.

दैनिक देशरत्न चे संपादक आणि सर्व सहकारी हे अगदी सामान्य कुटुंबातून येतात आणि सामान्य कुटुंबातून येणाऱ्या माणसांना प्रत्येक गोष्टीची आणि अडचणींची जाणीव असते. अगदी तसंच समाजातील सामान्य लोकांची जाणीव ठेवून देशरत्नची टीम काम करेल. वयाच्या 21 व्या वर्षी वर्तमान पत्राची सुरुवात करणं हे खूप मोठं पाऊल आहे आणि या उचललेल्या पाऊल चा सर्व नेवासा तालुका मधून कौतुक होत आहे. इतर वर्तमानपत्रांपेक्षा दैनिक देशरत्न वर्तमानपत्राने वेगळेपणा राखले आहे त्यामुळे तो लवकरच समाजामध्ये लोकप्रिय होताना दिसेल. तळ्या गळ्यातील बातम्यांना जागा मिळताना बघितल्यानंतर लोक हक्काचं वर्तमानपत्र आणि व्यासपीठ म्हणून दैनिक देशरत्न कडे बघत आहे. दैनिक देशात न चीठीन अत्यंत जिज्ञासू आणि अभ्यासू आहे, त्यामुळे प्रत्येक बातमीची योग्य ती पडताळणी आणि वास्तविकता समाजापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचली जाईल.
—-जैद शेख
(लेखक,सामाजिक कार्यकर्ते)

दैनिक देश रत्न ची टीम येणाऱ्या काळात अनेक समाजप्रबोधनाचे काम करणार आहे असं संपादकांचा प्रतिपादन होतं त्यानुसार वाटतंय की दैनिक देश रत्न ची टीम अत्यंत जागरूक आणि कर्तव्यदक्ष आहे.
—–मा.श्री.महेश ठुबे पाटील.

छोट्यातील छोटी बातमी अत्यंत गतिशील पद्धतीने पोहोचवण्याचं काम दैनिक देश रत्न करणार आहे. यामुळे समाजातील पारदर्शकता वाढेल.
—–मा.श्री. सुखदेव फुलारी.
(पञकार)

दैनिक देशरत्न ने अशी प्रणाली बनवली आहे की कोणीही त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचू शकतो. यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नांना ही एक व्यासपीठ मिळणार आहे.
—-मा.श्री.स्वप्निल भैय्या बनसोडे.
(जीवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव)

नवले बंधू एक लढवय्या पत्रकार आहेत. मागील अनेक वर्ष ते पत्रकारिता करीत आहे. दैनिक देशरत्न हे स्वतःचे वृत्तपत्र सुरु करून त्यांनी मोठी जोखीम उचलली कारण वर्तमान पत्र चालविणे सोपी गोष्ट नाही. त्यांचे लेखन उत्तम आहे. जिल्ह्याचा चेहरा देशरत्न मध्ये दिसला पाहिजे . नगरच्या विकासासाठी पत्रकारिता करावी , हि शुभेच्छा !
—मा.श्री.जयकिसन वाघपाटील .
(सकल मराठा सोयरीक डाॅट काॅम)
दैनिक देशरत्न हे नावाप्रमाणेच देशाचा रत्न ठरो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हक्काचा पेपर आत्तापर्यंत रस्त्याचा प्रश्न असो उसाच्या गाळपाचा प्रश्न असो हमीभावाचा प्रश्न असो या सर्वच प्रश्नावर सहसंपादक माझे मित्र कमलेशजी नवले यांनी आवाज उठवला त्यांचा आवाज निनाद बनला पाहिजे त्यासाठीच देश रत्ना हे निमित्त म्हणून प्रकाशित झाले आहे.
—–मा.श्री.प्रा.सचिन धस (सर)
(संचालक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेवलपमेंट अहमदनगर,प्रदेश सरचिटणीस जीवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,सार्थक डिजिटल,बँकिंग सेवा,श्री ज्योतिष वधु-वर सुचक केंद्र)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे