महाराष्ट्र

डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ.पोटफोडे यांचा ए.बी.पी. माझाकडून सन्मानपत्र देऊन गौरव.

शेवगाव -

जागतिक महामारीचे संकट सध्या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगावर आहे. अशा या संकटांमध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अमरापुर सारख्या ठिकाणी डॉ. अरविंद पोटफोडे यांनी हजारो रुग्णांना सेवा देत त्यांचे प्राण वाचवले. याच कार्याची दखल घेत आज ‘जागतिक डॉक्टर्स डे’ निमित्त ए.बी.पी. माझा परिवाराकडून त्यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, ए.बी.पी. माझाचे प्रतिनिधी निखिल चौकर, सरपंच विजयराव पोटफोडे, राजेंद्र पोटफोडे, राजेंद्र फलके, प्राचार्य निवृत्ती भांगरे, रवींद्र कुटे, मायकल मस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, शैलेश म्हस्के, विकास म्हस्के, अर्जुन काळोसे, राजेंद्र नांगरे, अमोल निकम, हेमंत पातकळ, संजय दुधाडे, बाळासाहेब घाटविसावे, तुकाराम विघ्ने, आदिल शेख, अंबादास कांबळे आदि उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानी बोलताना अॅड.शिवाजीराव काकडे म्हणाले की, डॉ.अरविंद पोटफोडे हे महाराष्ट्रातील पहिले सन्मानित डॉक्टर आहेत की, ज्यांना रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकर्‍यांनी मिळून बँड लावून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान केला. कृतज्ञता हा मानवी जीवनातील मोठा अविष्कार आहे. जेथे कृतज्ञताभाव आहे तेथे ईश्वराचं अस्तित्व असतं आणि डॉक्टर हे ईश्वराचे प्रतिनिधी आहेत असं मला वाटतं. आज ए.बी.पी. माझा परिवाराकडून डॉ.पोटफोडे यांना डॉक्टर्स डे निमित्त सन्मानित केले हे खरं म्हणजे आम्हा सर्वांनाच सन्मानित केल्यासारखा आहे. ए.बी.पी. माझाच्या या मोठ्या भूमिकेबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
डॉ.पोटफोडे म्हणाले की, आज माझा डॉक्टर्स डे निमित्त जो सन्मान केला याबद्दल एबीपी माझा आभार मानतो. हा डॉक्टर्स डे मला आयुष्यभर लक्षात राहील. कोरोना काळात काम केल्याची दखल घेत ए.बी.पी. माझाने सन्मानपत्र देऊन सत्कार केला खरतर हीच माझ्या कामाची पावती मला मिळाली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे