आपला जिल्हा

जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांचा राजीनामा

डॉ मुंडे यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने राजीनामा

शेवगाव / प्रतिनिधी :-  अहमदनगर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा चे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे, तसेच भाजप पक्षाकडून वारंवार मुंडे कुटुंबावर अन्याय होत असल्याचे लक्षात येत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे माहिती ढाकणे यांनी दिली आहे, ढाकणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सोपवला आहे.

      मंत्रिमंडळामध्ये डॉ प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानंतर राज्यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र चालू आहे,भाजपाकडून वारंवार मुंडे कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, ढाकणे यांच्या राजीनाम्यामुळे अहमदनगर जिल्हा भाजपामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे,

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे