Board Exams Updates 2023 : लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार आहेत. नवीन परीक्षा पद्धतीनुसार दिवाळीपूर्वी एक सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र आणि अंतिम सत्र पूर्ण होईल. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे.
दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्डाच्या परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांची मते मागवली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासली जाऊ शकत नाही, असे तुम्हाला वाटते का बोर्ड परीक्षा आयोजित करण्याची सध्याची पद्धत बदलण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षांची सध्याची पद्धत तशीच ठेवावी की बदलली पाहिजे.