9-Day Leave: ना मीटिंग, ना लॅपटॉप… कर्मचाऱ्यांना कंपनीने दिली 9 दिवसांची सुट्टी; सोशल मीडिया पोस्टवर धुमाकूळ

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

 

 

 

Meesho Announces 9-Day Leave: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने कर्मचाऱ्यांसाठी 9 दिवसांचा ब्रेक जाहीर केला आहे. हा ब्रेक 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत असेल. या ब्रेकला ‘रीसेट आणि रिचार्ज’ असे नाव देण्यात आले आहे. सोशल मीडियावर लोक कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

 

लोक म्हणत आहेत की, कंपनीने उद्योग क्षेत्रात एक चांगले उदाहरण ठेवले आहे. मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांना अशी सुट्टी देण्याचे हे चौथे वर्ष आहे. या ब्रेक दरम्यान कर्मचाऱ्यांना कामासंबंधात कोणताही फोन येत नाही.

 

 

 

मीशोने लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये लिहिले, कोणताही लॅपटॉप नाही, मेसेज नाहीत, ईमेल नाहीत, मीटिंग नाहीत आणि स्टँड-अप कॉल नाहीत, 9 दिवस काहीही काम नाही! 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आम्ही आमच्या चौथ्या ‘रीसेट आणि रिचार्ज’ ब्रेकवर जात आहोत.

 

मीशोसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले जात आहे. कंपनीचा मेगा ब्लॉकबस्टर सेल प्रचंड यशस्वी झाला. अशा परिस्थितीत, कंपनीला आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कामातून ब्रेक घ्यावा आणि ताजेतवाने परत कामावर यावे असे वाटते.

 

 

कंपनीने म्हटले की, या वर्षाच्या सर्व कठोर परिश्रमानंतर आणि आमच्या यशस्वी मेगा ब्लॉकबस्टर विक्रीनंतर, आता स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. हा ब्रेक आपल्याला आपले मन आणि शरीर ताजेतवाने करण्यासाठी आहे, जेणेकरून आपण नवीन उर्जेने पुढील वर्षाची सुरुवात करू शकू.

 

सोशल मीडिया यूजर्सनी कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, सर्व कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांचा ब्रेक देण्याच्या निर्णयाचे मी कौतुक करतो.

 

आजच्या धावपळीच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या कामाच्या चक्रात अडकणे आणि ब्रेक घेण्याचे महत्त्व विसरणे खूप सोपे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांचा ब्रेक देण्याच्या निर्णयावरून असे दिसून येते की मीशो आपल्या कर्मचाऱ्यांची कदर करते.

 

 

मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) वळसे पाटील यांची भेट महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित कृती समितीचे संस्थापक राज्य अध्यक्ष राजु जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका उच्च शिक्षित एम.एड कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली.

 

सविस्तर चर्चा केली.यावेळी संघटनेचे आंबेगाव तालुका सरचिटणीस अरविंद मोढवे, तालुका कार्याध्यक्ष भगवान टाव्हरे, कोषाध्यक्ष किसन शिंगाडे, राज्य कार्यवाह जनार्धन बोटकर, प्रवक्ते सखाराम मुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी मिलिंद पानसंडे, एस.सी तांबे उपस्थित होते.

 

‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांमध्ये उच्च प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास या दृष्टिकोनातून विविध उपक्रमाचे नियोजन आणि शिक्षणाचे सार्वत्रीकिकरण करणे. या दृष्टिकोनातून अनुभवी कार्यात उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना संधी दिली तर शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रम राबवणे बाबत महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशांमध्ये प्रथम क्रमांकाचे शैक्षणिक विकासाबाबत राज्य प्रगत होऊ शकते.

 

कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधून नियुक्ती केल्या तर कोणताही आर्थिक अधिभार शासकीय तिजोरीवर येणार नाही. केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पदोन्नतीमध्ये उच्च शिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांना ५०-५० टक्के पदे देणे, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करून सातव्या आयोगामध्ये पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत वेतन त्रुटी, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ, ऑनलाइन कामे तसेच मुख्यालय बाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.’ अशी माहिती राजू जाधव यांनी दिली.

 

‘अनुभवी उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीबाबत योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेवाशर्ती अधिनियम १९६७ चे राजपत्र बदलणे बाबतची कार्यवाही करणे विषयीची लवकरच ग्रामविकास विभागाची बैठक आयोजित केली जाईल.’

Leave a comment