Astrology : धनत्रयोदशीपासून 5 राशींचं नशीब पालटणार; लक्ष्मी नारायण राजयोग करणार कमाल, नोकरी-व्यवसायात बंपर धनलाभ..!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

 

Mercury Transit 2024 : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होईल. लक्ष्मी नारायण राजयोग बनल्यामुळे मिथुन आणि तूळ राशीसह 5 राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होईल. तसेच दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर व्यवसायातही मोठी कमाई होईल.

 

बुध हा बुद्धिमत्ता आणि संपत्तीचा कारक मानला जातो. तर शुक्र हा धन, समृद्धी आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. या दोन्हींच्या युतीमुळे तयार झालेला लक्ष्मी नारायण राजयोग जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडेल. धनत्रयोदशी (Dhanteras 2024) कोणत्या 5 राशींचं नशीब पालटणार? जाणून घेऊया.

 

 

मिथुन रास (Gemini)

 

बुध संक्रमणाच्या प्रभावामुळे तुमचा खिसा भरलेला असेल, पण या काळात तुमचा खर्चही खूप जास्त असेल. ही वेळ तुमच्यासाठी राजयोग घेऊन आली आहे, परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे कमाईपेक्षा जास्त खर्च करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या काळात तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील आणि तुम्ही व्यवसायात खूप नाव कमवाल. तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि करिअरमध्ये तुमची अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

सिंह रास (Leo)

 

सिंह राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे काही उत्कृष्ट कामासाठी अवॉर्ड मिळू शकतो. या काळात तुमच्यासाठी नवीन वाहन खरेदी करण्याची शुभ संधी आहे आणि तुमची ही इच्छा पूर्ण देखील होऊ शकते. तुम्ही मालमत्ता खरेदी आणि विक्री देखील करू शकता. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात चांगली कमाई करण्यात यशस्वी ठराल. तुमच्या बँक बॅलन्समध्येही लक्षणीय वाढ होईल.

 

 

 

तूळ रास (Libra)

 

तूळ राशीच्या लोकांना बुध संक्रमणामुळे आर्थिक फायदा होईल. मेहनती व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून शक्य ती सर्व मदत मिळत राहील. जुगार किंवा सट्टेबाजीपासून दूर रहा. लक्ष्मी नारायण राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुमची जीवनात प्रगती होईल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील.

 

 

वृश्चिक रास (Scorpio)

 

वृश्चिक राशीचे लोक बुधाची चाल बदलल्याने आनंदी जीवन जगतील. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदे मिळतील. तुमच्या बोलण्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडेल. तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि कलेने सर्वांना तुमच्याकडे आकर्षित कराल. या काळात तुमचा ऑरा विनोदी असेल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. शत्रू देखील तुमचं काह बिघडवू शकणार नाही.

 

 

कुंभ रास (Aquarius)

 

बुधाचया प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुमचं राहणीमान सुधारेल. कठीण परिस्थितीतही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचं उत्पन्नही वाढेल आणि तुमच्या वडिलांचीही प्रगती होईल. जर तुम्ही लेखन, संपादक किंवा कोणत्याही कंत्राटी पद्धतीचं काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल. बुधाचं हे संक्रमण तुम्हाला परदेशात जाण्याच्या संधी उपलब्ध करुन देईल आणि तुम्हाला चांगलं भाग्य मिळवून देईल.

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas