Today’s Gas price in Maharashtra : देशातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा घसरल्या. केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले. सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने महागाई आटोक्यात येण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे. सिलेंडरचे भाव कमी झाल्याने हॉटेलिंग आणि बाहेरील खाद्यपदार्थ स्वस्त मिळतील.
देशातील चार प्रमुख शहरातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्ह एकदा कमी झाल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळी संपली असली तरी उत्तर भारतात छट पुजेचे अनन्यसाधरण महत्व आहे. या काळात केंद्र सरकारने हा दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने 15 दिवसांपूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली होती. तर यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत 1731.50 रुपये, कोलकत्तामध्ये 1839.50 रुपये, मुंबईमध्ये 1684 रुपये तर चेन्नईत हा दर 1898 रुपये होता.
महाराष्ट्रातील गॅस सिलेंडर चे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा