MHT CET admit Card 2024 सीईटीचे ऍडमिट कार्ड उपलब्ध.. या पद्धतीने करा डाऊनलोड.

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

MHT CET admit Card 2024 :- महाराष्ट्र स्टेट कॉमन इंटरेस्ट एक्झाम अर्थातच mht cet  लवकरच आपल्या परीक्षेचे ऍडमिट कार्ड प्रसिद्ध करणार आहे. PCB ग्रुपची परीक्षा 22 एप्रिल आणि PCM ग्रुपची परीक्षा 02 मे रोजी सुरू होणार, या दोन्ही ग्रुपसाठी लवकरच प्रवेश पत्र जारी करण्यात येणार आहेत त्या कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे याची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल महाराष्ट्र लवकरच प्रवेश पत्र जारी करणार आहे. नोंदणीकृत उमेदवार आपल्या युजर आयडी चा वापर करून अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकणार. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्डची आवश्यकता असणार आहे..

13 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या थेट लॉगिन मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयडी चा उपयोग करून लॉगिन करून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यावे

परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे असणार आहेत..

MHT CET admit Card 2024
MHT CET admit Card 2024 

आगामी लोकसभा निवडणूक मुळे परीक्षेच्या तारखांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत याची प्रसिद्धी पत्र अधिकृत वेबसाईटवर जारी केलेले आहे.

 MHT CET admit Card 2024 या पद्धतीने करा प्रवेश पत्र डाउनलोड..

2024 हॉल तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवार खालील पद्धतीचा अवलंब करून आपले हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात.

  • https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत साईटला भेट द्या
  • होम पेजवर उपलब्ध असलेल्या एडमिट कार्ड 2024 डाउनलोड या लिंक वर क्लिक करा.
  • आपला युजर आयडी आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
  • त्यानंतर सबमिट करून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्या

या दिवशी होणार परीक्षा..

यावर्षी ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पेन आणि पेपरच्या पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे.

PCB ग्रुप साठी 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल 2024 या रोजी परीक्षा घेतली जाईल परीक्षा ही सकाळी 09 ते 12 आणि दुपारी 02 ते 05 अशा दोन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे.

PCM ग्रुपची परीक्षा ही मे महिन्यात 2 3 4 9 10 11 15आणि 16 17 मे 2024 रोजी होणार आहे लवकरच उमेदवारांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

Leave a comment