Monsoon 2024 :  यावर्षी कसा असेल मान्सूनचा पाऊस! यंदा कसा राहणार पाऊस काळ पहा IMD चा सविस्तर अहवाल…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Monsoon 2024 :  यावर्षी कसा असेल मान्सूनचा पाऊस! यंदा कसा राहणार पाऊस काळ पहा IMD चा सविस्तर अहवाल..

IMD monsoon 2024 predictions : यावर्षीचा हंगाम असा तसा गेला उन्हाळा सुरू झाला आणि शेतकरी राजाला प्रश्न पडला की यंदा मान्सून कसा राहील पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल की जास्त पडेल… मान्सूनच्या आगमनाची चर्चा सर्व दूर पसरली असताना नेमका काही  दिवसांपूर्वीच  भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदाच्या मान्सूनचा पहिलावहिला अंदाज वर्तवत बळीराजासह सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे.

सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी आयएमडी ने पत्रकार परिषद घेत यावर्षी मान्सन कसा राहील याविषयी आपला सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. यंदाच्या वर्षी देशात 8 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

यंदा महाराष्ट्रासह सर्वच राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होनार आसून  चांगला पाऊस राहनार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत 106% पाऊस होईल अशी माहिती IMD कडून देन्यात आली आहे. ८७ सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आहे.

2024 मान्सून  यंदा  सरासरी पेक्षा  जास्त पाऊस काळ राहण्याची शक्यता आहे , 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे.

हवामान शास्त्रज्ञ एम. रविचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मान्सून साठी सध्याची परिस्थिती चांगली आहे.

दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आणि वाऱ्याची परिस्थिती मान्सूनपूर्वक असल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

Mansoon 2024 पुढील राज्यात होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस…

राजस्थान, पंजाब,चंदिगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, सिक्किम, मेघालय अरुणाचल, अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप, दादर दमन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे..

यंदा देशाच्या दक्षिण पश्चिमेसोबत उत्तर पश्चिमेला समाधानकारक पाऊस होईल असं सांगितलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र पाऊस चकवा देईल असा इशाराही Skymet नं दिला आहे. Monsoon 2024

Leave a comment