गुन्हेगारी

हातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी

शेवगाव news18marathi

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी झंज यांच्या घरात प्रवेश करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65) प्रकाश दिलीप झंज ( वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास झाला झाल्याच्या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे .दरोडेखोरांनी एक लाख बेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 60 हजार रुपये रोख असा सुमारे दोन लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शोभाबाई प्रकाश झंज ( वय – 25) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


     

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, हातगाव येथील झंज कुटुंब गावात भर वस्तीत राहत असून शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास राहत्या घराचा दरवाज्या तोडून घरात प्रवेश करुन दरोडेखोरांनी सामानाची उचकपचक करून मौल्यवान वस्तू रोख रक्कम लंपास केल्या. त्याचवेळी दिलीप झंज, प्रकाश झंज यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी पितापुत्रावर सशस्त्र हल्ला केल्याने दोघे रक्तबंबाळ झाले. आरडा ओरड करताच दरोडेखोरांनी पोबारा केला दोघांचा प्रयत्न तोकडा पडला. ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेवगावला हलविण्यात आले मात्र डोक्याला जबर मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले .
       ग्रामस्थांनी घटनेची माहिती बोधेगाव पोलिसांना दिली त्यानंर उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरी यांनी भेट दिली .
         या बरोबरच सत्यनारायण साखरे, बबन गोसावी, मगर, अभंग, गहिनीनाथ अभंग, यांच्या घरी दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अशस्वी झाला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे