व्हॉट्सअपवर पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी राज्य शासकीय कर्मचारी निलंबित | State Employees Suspension

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

State Employees Suspension:निवडणूककाळात प्रचार करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.

पंचायत समिती नायगाव येथील यू, एस.

धोटे या वरिष्ठ सहायकाला निलंबित केल्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज जारी केले आहे.

‘व्हॉट्सअॅप’द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे

जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.

निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली असून, आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही,

याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सोशल मिडियावर निवडणूक विभागाचा वॉच

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने व्हॉटसअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आदी सोशल प्लॅटफार्मवर साबयर सेलचे विशेष लक्ष आहे.

त्यासाठी निवडणूक विभागाने विशेष पथक नियुक्त केले आहे.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट, फोटो तसेच शासकीय कर्मचाऱ्यांकडून होणारा उमेदवारांचा प्रचार आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे.

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जिल्ह्यातील शंभराहून अधिक जणांना आजपर्यंत सायबर विभागाच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Leave a comment