पिक कर्ज :- सरकार देते कमी व्याजारात शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज..!! फक्त येथे करा अर्ज..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Crop loan | पिक कर्ज योजना :- आता नुकताच उन्हाळा सुरू असून लवकरच खरीप हंगाम सुरू होणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवांना बी बियाणे खरेदी करावे लागतात आणि यासाठी शेतकरी बांधवांकडे पैशाची टंचाई भासते. यासाठी उपाय म्हणून सरकार शेतकऱ्यांना कमी व्याजारात पीक कर्ज पुरवते परंतु या पीक कर्जाविषयी माहिती नसल्याने अनेक शेतकरी बांधव पीक कर्जापासून वंचित राहतात.

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून पीक कर्ज मिळवणकरता कोणते कागदपत्र लागतात यासाठी सरकारची कोणती योजना आहे कुठे अर्ज करायचा आणि अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार याची सविस्तर माहिती आज आपण  जाणून घेणार आहोत.

पिक कर्ज नेमके कशासाठी आणि कोणत्या गोष्टीवर दिले जाते..

शेतकरी बांधवांना शेती उपयोगी अवजारे औषधे खते बी बियाणे शेतीचा खर्च जसे की नांगरट कोळपणी खुरपणी अशा वेगवेगळ्या खर्चासाठी शेतकऱ्यांना एक वर्षासाठी पीक कर्ज दिले जाते. या पीक कर्जाला दरवर्षी नवे जुने करणे गरजेचे असते. जास्त मुदतीचे कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधवांना त्यासाठी व्याजदर पण जास्त असतो.

शेतकरी बांधव एक वर्षासाठी पीक कर्ज मिळू शकतात यासाठी काही कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिले आहे.

1.60 लाखापर्यंतच्या नवीन पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं
  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • जमिनीचा नकाशा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • स्टॅम्प (कर्ज मर्यादानुसार 100 रु. 3 किंवा 4 स्टॅम्प)
  • इतर बँकेकडून कर्ज न घेतल्याचा दाखला.

ही कागदपत्र विनामूल्य तलाठ्याकडून शेतकऱ्यांना मिळतात. याशिवाय शेतकऱ्यांना चार फोटोचीही गरज भासते.  दरवर्षी शेतीचा खर्च वाढत असतो. त्यामुळं दरवर्षी २० टक्के वाढीव पीककर्ज मिळतं. प्रत्येक पिकाला किती कर्ज द्यायचं याचे निकष ठरलेले असतात. कोरडवाहूला एकरी ८ हजार आणि ओलीताच्या शेतीला १६ हजाराचं पीककर्ज मिळतं.

 

किसान क्रेडिट योजनलनेची (Kisan Credit Card) माहिती

एखाद्या शेतकऱ्याला मत्स्यपालन, पशुपालन किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो शेतकरी किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला स्वस्त व्याजदरात कर्जाची सुविधा पुरवली जाते. सरकारकडून हे कर्ज 2% ते 4% पर्यंत व्याजदरावर दिले जाते. ज्यामुळे शेतकरी हे कर्ज सहज फेडू शकतो. खास म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांना बराच वेळ देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला विमा संरक्षण लवचिक परतफेड आणि कमी व्याजदर अशा सुविधा दिल्या जातात.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी बांधवांना एक स्मार्ट कार्ड, बचत खाते खोलून दिले जाते यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.

दरवर्षी पिक कर्जासाठी बँकेत लांबच लांब रांगा लावल्या जातात यासाठी शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन आपला अर्ज दाखल करावा जेणेकरून योग्य वेळी गैरसोय होणार नाही.

Comedy video :- “नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” हसून हसून पोट दुखेल

Leave a comment