Mansoon Alert मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Mansoon Alert नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला असून राज्यात विविध ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यात  जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन चार दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात चांगलाच अवकाळी पाऊस झोडपणार असून आज हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मराठवाड्यातील पुढील जिल्ह्यात होणार विधानसभा कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस..

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड या ठिकाणी अवकाळी पाऊस राहील. तसेच जालना, छत्रपती संभाजी नगर धाराशिव या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे वादळी वाऱ्यामुळे पशुधनाला नुकसान होऊ शकते त्यासाठी योग्य त्या निवाऱ्याची निवड करून पशुधनाचे व्यवस्थापन करावे.

गहू आणि हरभरा या पिकांची काढणी झाली असल्यास शेतकरी बांधवांनी योग्य त्या निवाऱ्या त आपले पिक साठवून ठेवावे जेणेकरून अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

Monsoon 2024 :  यावर्षी कसा असेल मान्सूनचा पाऊस! यंदा कसा राहणार पाऊस काळ पहा IMD चा सविस्तर अहवाल…

विदर्भातील पुढील जिल्ह्यात येलो अलर्ट जारी… Mansoon Alert

 

राज्यात उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच विदर्भातील गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर वाशिम वर्धा या जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी. काही ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणार असून गारपीट होण्याची शक्यता आहे  या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मागील काही आठवड्यात दिसून आले आहे.

उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.Mansoon Alert

Pm Rooftop Yojana Maharashtra | Rooftop Scheme maharashtra 2024 

mansoom alert

Leave a comment