School Holiday :- दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर , असे असेल यंदाचे शैक्षणिक वर्ष, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

school Holiday :- दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर , असे असेल यंदाचे शैक्षणिक वर्ष, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

school Holiday :- शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ या सारख्या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीचे समायोजन करता येणार आहे. शैक्षणिक वर्षात एकुण सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

  शाळांचे कामाचे दिवस किमान 230 असलेच पाहिजे. मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील 2 स्थानिक सुट्टया निश्चित करुन त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवाव्या लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्टया व शासन स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टया शाळांनी घेणे बंधनकारक आहे.

इथे क्लिक करून पहा दिवाळीच्या सुट्टीचे वेळापत्रक.

  दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्यावर शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी एका आदेशाद्वारे जाहीर केले होते. मात्र हा आदेश मागे घेत सुट्ट्या पूर्वीप्रमाणेच राहतील असा आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढला आहे.

Maharashtra school Holiday list

सतरा ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असताना आणि त्याप्रमाणे सर्व नियोजन झालेले असताना दिनांक बावीस नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी काढले होते.

 शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी करण्यासाठी आणि या निमित्ताने विभागातील सर्व शाळांमध्ये संपर्क करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत बदल करायला शिक्षण विभागाला दिनांक 12 रोजी पत्र दिले. आणि दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

इथे क्लिक करून पहा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक.

Leave a comment