दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल आणि चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो या संबंधित महत्त्वाचे अपडेट आली आहे.
दहावी-बारावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश घेण्यासाठी सोपे होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा नतर मे महिन्यात विद्यार्थी उन्हाळ्यात बाहेरगावी फिरायला जात असतात परंतु यावर्षी मे महिन्यातच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना पुढील प्रवेशासाठी भरपूर टाईम मिळणार आहे . महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट तसेच एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला हा निकाल कळू शकतो.
SSC HSC Result 2024 कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2:10 पर्यंत चालली, त्यानंतर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6:10 पर्यंत होती. यावेळी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचे पुनरावलोकन करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे देण्यात आली नाहीत. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या उत्तरांचे पुनरावलोकन करण्यासाठी किंवा अंतिम रूप देण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे देण्यात आली होती.Board Exam Result
PCMC Fireman Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 150 जागांसाठी भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास
दहावी, बारावीचा निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी याची नेमकी तारीख अद्याप समोर आली नाहीय. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला परीक्षा क्रमांक टाकावा लागेलय यानंतर निकाल तुमच्या समोर येईल.
यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. बारावीसाठी एकूण 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.तर दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदाचा निकाल कसा लागतो? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार वर्षातील निकाल जाहीर होण्याच्या तारखा SSC HSC Result 2024
- 2023- 02 जून
- 2022- 17 जून
- 2021- 16 जुलै
- 2020- 29 जुलै
CBSE Result news 2024 आता 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासता येणार